जाणून घ्या मिठाचे फायदे
मित्रांनो आजीबाईच्या बटव्यातील आणखी एक मुल्यवान रत्न म्हणजे 'मीठ'. तुम्ही म्हणाल मीठ कसे काय मुल्यवान रत्न? उलट आजकाल तर प्रत्येक डॉक्टरकडे गेलो तर तो पहिले सांगतो. ब्लडप्रेशर वाढले, मीठ कमी खा. शुगर वाढली, मीठ कमी खा. अंगावर सुज आली, मीठ कमी खा. मीठ, साखर, साबुदाणा, मैदा हे पांढरे पदार्थ तुमचे शत्रू आहेत आणि तुम्ही म्हणता मीठ हे मुल्यवान रत्न आहे. मित्रांनो मला सांगा धारदार सुरीने एखाद्याचा जीव जातो पण तीच धारदार सुरी घेऊन डॉक्टर रुग्नाचे ऑपरेशन करतो. याचा अर्थ काय? थोडक्यात सुरी वाईट नसते तिचा वापर आपण कसा करतो यावर ती चांगली का वाईट ते ठरते. मी तुम्हाला आज जे काही सांगणार आहे त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहीत असतील कारण पूर्वापार आपल्या घराघरातून त्या अगदी सहजतेने केल्या जातात पण आजकाल आधुनिकतेच्या नादात आपल्याला त्याचा थोडा विसर पडला आहे. कोरोना सारख्या विषाणूजन्य आजारात जेव्हा घसा खवखवू लागतो तेव्हा कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्या असता लगेचच आराम पडतो . इतकेच काय पांढरा चिकट कफ झाला असेल तर कितीही उपचार केले तरी कफ सुटता सुटत नाही अशावेळी एक साधासा उपाय कराव...