#आंबुटी



O



 

#आंबुटी

Oxalis Corniculata Linn.(छोटी)
Oxalis acetosella Linn.(बडी)
In English- Indian Sorrel
आज आपण आंबुटी किंवा चंपा मेथी या वनस्पतीची ओळख करून घेणार आहोत अनेक ठिकाणी हिला चांगेरी घास म्हणूनही ओळखले जाते छोटी चांगेरी आणि बडी चांगेरी असे दोन प्रकार आहेत. ही वनस्पती जमिनीवर तण स्वरूपात पसरत जाते. पिवळ्या किंवा गुलाबी रंगाची छोटी फुले येतात. त्याचप्रमाणे काडेपेटीच्या काडीच्या
आकाराच्या छोट्या-छोट्या शेंगा येतात.हिची चव आंबट असते. बऱ्याचदा कुंडी मधे उगवते आणि तण समजून आपण उपटून टाकतो.परंतु ही वनस्पती अत्यंत औषधी आहे अनेक आजारावर गुणकारी आहे प्रामुख्याने पचनशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे. या वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क जीवनसत्व असतात. त्यामुळे हिरड्यांच्या सर्व आजारावर गुणकारी आहे. या वनस्पतीला 'पागलपण की दवा' असेही म्हटले जाते कारण जर भांग पिल्यामुळे किंवा धोत्र्याच्या बिया मुळे नशा चढली असेल तर हिचा रस नशा उतरवण्यासाठी दिला जातो. मुळव्याधीवर पण अत्यंत गुणकारी आहे. अशा या वनस्पतीच्या गुणांचे वर्णन करण्यापेक्षा जेव्हा जेव्हा कुठे दिसेल तेव्हा सरळ जेवणामध्ये भाजी स्वरूपात किंवा चटणी स्वरूपात वापर करणे जास्त हिताचे आहे. ज्याप्रमाणे आपण पुदिन्याच्या पानांची चटणी करतो त्याप्रमाणे पुदिना आणि आंबुटीची पाने एकत्र करून चटणी करता येते आणि सहजच तिच्या सर्व औषधी गुणांचा फायदा मिळतो
माहीती संकलन
प्रा.डाॅ सुचेता दळवी


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शमी

कांचन वृक्ष

#अर्जुन वृक्ष