शमी
शमी # शमी # खेजरी # prosopis_cineraria शमी किंवा खेजरी हा लेग्युमिनेशी कुळातील वृक्ष असून बहुवर्षीय वृक्ष आहे. याचे वैज्ञानिक नाव 'प्रोसोपीस सिनेरेरिया' हे आहे. तर इंग्रजीमध्ये यास स्पंज ट्री असे म्हटले जाते. धनिष्ठा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. ज्यांना शनि देवाला प्रसन्न करून घ्यायचा आहे त्यांनी शमी वृक्ष लावावा असे म्हणतात. या प्रोसोपीस वंशात आपल्याला 44 प्रजाती दिसून येतात. या प्रजाती भारताबरोबरच पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, त्याचबरोबर अरब देशातील वाळवंटी भागात दिसून येतात. संस्कृत मध्ये यास 'शमी' असे म्हणतात तर राजस्थानमध्ये खेजडी दिल्लीमध्ये जोंटी, पंजाब हरियाणा मध्ये जोंड, गुजरात मध्ये समी किंवा सुमरी, कर्नाटक मध्ये बन्नी, तामिळनाडूमध्ये वन्नी तर अरब देशात गाफ असे म्हणतात अतिशय कमी पाणी, तेज धूप, गरम हवा, अतिशय कमी तापमान सहन करणारा हा वृक्ष वाळवंटी प्रदेशात केवळ तग धरून राहतो एवढेच नव्हे तर सदा हिरवागार असतो. त्यामुळेच याला थारचा कल्पवृक्ष किंवा राजस्थानचा कल्पवृक्ष असेही म्हटले जाते. त्याचे जतन करण्याच्या उद्देशाने 31 ऑक्टोबर 1983 मध्ये त्याला राजस्थान राज्याच...