#अर्जुन वृक्ष
#अर्जुन वृक्ष लॅटिन नाव- Terminalia Arjuna आज आपण अर्जुन ह्या दैवी गुण असलेल्या वृक्षांची ओळख करून घेणार आहोत.अर्जुन ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ पांढरा स्वच्छ.त्याच्या पांढऱ्या खोडामुळे त्याला हे नाव मिळाले असावे असे वाटते.अर्जुन हा एक विशाल वृक्ष आहे साधारणपणे ६०-८० फुटांपर्यंत पण वाढतो त्याची कठीण कवचाची फळे नदीत वाहत जाऊन रूजत असावीत त्यामुळे नदीच्या कडेने हे वृक्ष दिसून येतात.किंचीत राखाडी झाक असलेले गुळगुळीत पांढुरके खोड हे याचे खास वैशिष्ट्ये आहे. ऐन आणि अर्जुन कोकणामध्ये ऐन आणि अर्जुन असे दोन्ही वृक्ष दिसून येतात बऱ्याचदा ऐन आणि अर्जुन यामध्ये गल्लत होताना दिसून येते. दोन्हीही वृक्ष सारखेच दिसतात परंतु ऐनाचे खोड खरखरीत भेगा पडलेले तपकिरी असते तर अर्जुनाचे खोड पांढुरके आणि गुळगुळीत असते. अर्जुनाची फळे अर्जुनाची फळेही वैशिष्ट्यपूर्ण असतात ताक करायच्या रवी चे कणीस असते तसे पाच पंख असलेले फळ असते. पूर्ण तयार झाल्यावर याचा रंग तपकिरी दिसतो आंब्याच्या बाट्याप्रमाणे यावर कठीण कवच असते. नदीच्या पाण्यात वाहत जाऊन नदीकाठी याची झाडे उगवलेली दिसून येतात त्यामुळे 'नदी सर्ज' असेही...