पोस्ट्स

खैर वृक्ष

इमेज
 #खैर  #acacia_catechu  काता बद्दल प्रसिद्ध असलेला काटेरी वृक्ष खैर- बाभूळ,खदिर वगैरे नावाने ओळखली जाणारी वनस्पती असून, फॅबेसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव अकेशिया कॅटेच्यू आहे. खैर हा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष आहे. ९ ते १२ मीटर उंच वाढतो. फांद्या कोवळेपणी हिरव्या व जुन झाल्यावर करड्या व खरबरीत होतात. काटे लहान, पण टोकाला वाकडे असतात.  पाने संयुक्त व पिसासारखी असून, दलाच्या दहा-बारा जोड्या असतात.  फुले पिंगट पिवळी व पानांच्या बगलेत कणिशावर  ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये येतात.  शेंगा पातळ पिंगट सरळ पाच ते आठ सेंटीमीटर लांब व टोकास चोची सारख्या असतात. त्यात तीन ते दहा बिया असतात  खैराचे लाकूड अतिशय कठीण व टिकाऊ असून त्यास वाळवी लागत नाही. तासून व रंधून ते गुळगुळीत होते. शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, मुसळ, होड्या घराचे खांब, तलवारीच्या मुठी,तेलाच्या घाण्यांच्या लाटा, जात्याचा खुंटा, लोहार, सुतार यांच्याकडील हत्यारांचे दांडे, उसाचा रस काढायचा चरक इत्यादीसाठी उपयुक्त असते. खैराच्या खोडाच्या लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळून काढलेल्या पदार्थास 'कात' म्हणतात.  कोवळी पाने आणि फां

कांचन वृक्ष

इमेज
#कांचन वृृक्ष #Bauhinia variegata                         ' कांचन' आपल्यासाठी नवीन नाही. आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये त्याचा उल्लेख अतिशय दिमाखात आणि महाराष्ट्राची ओळख म्हणून केलेला आहे. तोच हा कांचन वृक्ष! आठवतात का बघा तुम्हाला या ओळी!                                                        अंजन,कांचन करवंदीच्या काटेरी देशा |                                                        बकुळ फुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा ||                             यावरून तुमच्या हेही लक्षात येईल की महाराष्ट्राची ओळख बनलेले हे झाड तुम्हाला कोठेही पाहायला मिळते. सदाहरित असल्याने सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून रस्त्याच्या दुतर्फा सुद्धा ही झाडे लावलेली दिसतात.                        कांचन हा मध्यम आकाराचा वृक्ष असून कुठल्याही प्रकारच्या जमिनीत सहज वाढतो. एकदा मोठा झाला की याला पाण्याची गरज नाही, पावसाचे पाणी पुरते. याची मुळे जमिनीत खोल जाऊन पाणी शोषतात. याची पाने आपट्याच्या पानांच्या आकाराची असतात. पण आकाराने मोठी आणि हिरवीगार असतात. आपट्यापेक्षा ही कमी खरखरीत असतात. वर्षभर हे झाड सदाहरित राहत

जाणून घ्या मिठाचे फायदे

इमेज
  मित्रांनो आजीबाईच्या बटव्यातील आणखी एक मुल्यवान रत्न म्हणजे 'मीठ'. तुम्ही म्हणाल मीठ कसे काय मुल्यवान रत्न? उलट आजकाल तर प्रत्येक डॉक्टरकडे गेलो तर तो पहिले सांगतो. ब्लडप्रेशर वाढले, मीठ कमी खा. शुगर वाढली, मीठ कमी खा. अंगावर सुज आली, मीठ कमी खा. मीठ, साखर, साबुदाणा, मैदा हे पांढरे पदार्थ तुमचे शत्रू आहेत आणि तुम्ही म्हणता मीठ हे मुल्यवान रत्न आहे. मित्रांनो मला सांगा धारदार सुरीने एखाद्याचा जीव जातो पण तीच धारदार सुरी घेऊन डॉक्टर रुग्नाचे ऑपरेशन करतो. याचा अर्थ काय? थोडक्यात सुरी वाईट नसते तिचा वापर आपण कसा करतो यावर ती चांगली का वाईट ते ठरते. मी तुम्हाला आज जे काही सांगणार आहे त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहीत असतील कारण पूर्वापार आपल्या घराघरातून त्या अगदी सहजतेने केल्या जातात पण आजकाल आधुनिकतेच्या नादात आपल्याला त्याचा थोडा विसर पडला आहे. कोरोना सारख्या विषाणूजन्य आजारात जेव्हा घसा खवखवू लागतो तेव्हा कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्या असता लगेचच आराम पडतो . इतकेच काय पांढरा चिकट कफ झाला असेल तर कितीही उपचार केले तरी कफ सुटता सुटत नाही अशावेळी एक साधासा उपाय कराव

#आंबुटी

इमेज
O   #आंबुटी Oxalis Corniculata Linn.(छोटी) Oxalis acetosella Linn.(बडी) In English- Indian Sorrel आज आपण आंबुटी किंवा चंपा मेथी या वनस्पतीची ओळख करून घेणार आहोत अनेक ठिकाणी हिला चांगेरी घास म्हणूनही ओळखले जाते छोटी चांगेरी आणि बडी चांगेरी असे दोन प्रकार आहेत. ही वनस्पती जमिनीवर तण स्वरूपात पसरत जाते. पिवळ्या किंवा गुलाबी रंगाची छोटी फुले येतात. त्याचप्रमाणे काडेपेटीच्या काडीच्या आकाराच्या छोट्या-छोट्या शेंगा येतात.हिची चव आंबट असते. बऱ्याचदा कुंडी मधे उगवते आणि तण समजून आपण उपटून टाकतो.परंतु ही वनस्पती अत्यंत औषधी आहे अनेक आजारावर गुणकारी आहे प्रामुख्याने पचनशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे. या वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क जीवनसत्व असतात. त्यामुळे हिरड्यांच्या सर्व आजारावर गुणकारी आहे. या वनस्पतीला 'पागलपण की दवा' असेही म्हटले जाते कारण जर भांग पिल्यामुळे किंवा धोत्र्याच्या बिया मुळे नशा चढली असेल तर हिचा रस नशा उतरवण्यासाठी दिला जातो. मुळव्याधीवर पण अत्यंत गुणकारी आहे. अशा या वनस्पतीच्या गुणांचे वर्णन करण्यापेक्षा जेव्हा जेव्हा कुठे दिसेल तेव्हा सरळ जेवणामध्ये भाजी स्वरूपा

#निर्गुडी

इमेज
  # निर्गुडी लॅटिन - VITEX NIGUNDO English -Five leaved chaste संस्कृत - निर्गुण्डी कोकणामधे शेताच्या बांधावर , परसावनाच्या कुपणीवर , अगदी इकडे तिकडे मोकळ्या जागी सहजतेने तुम्हाला ही वनस्पती दिसून येते . कुणाचा पाय मुरगळला असेल , वयोमानानुसार सांधे दुखत असतील , सांध्यांना सुज आली असेल तर लगेच निगडीचा पाला आणला जातो , पान गरम करून सुजलेल्या जागी ठेऊन वरुन पट्टीने बांधले की झाले काम . बाळंतीण बाईच्या आंघोळीच्या पाण्यात निगडीचा पाला हमखास टाकला जातो . तसेच बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतर जर काही दिवस निगडीची चार - पाच पानांचा काढा घेतला तर गर्भाशयाची अंतर्गत स्वच्छता व्हायला मदत होते . कंबरदुखी वर निगडीच्या पानांचा लेप आणि काढा यांचा चांगला गुण येतो . मासीक पाळीत खुप पोट दुखणं असेल तर निगडीच्या चहाने आराम पडतो . बाळंतीण बाईला वात वाढू नये म्हणून निगडीचा पाला पाण्यात उकळून त्याचा वाफारा सर्वांगाला दिला जातो . निगडीचे तेलाने हलके मालीश केल्यास दुखणाऱ्या सांध्यांना आराम प

#अर्जुन वृक्ष

इमेज
  #अर्जुन वृक्ष  लॅटिन नाव- Terminalia Arjuna आज आपण अर्जुन ह्या दैवी गुण असलेल्या वृक्षांची ओळख करून घेणार आहोत.अर्जुन ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ पांढरा स्वच्छ.त्याच्या पांढऱ्या खोडामुळे त्याला हे नाव मिळाले असावे असे वाटते.अर्जुन हा एक विशाल वृक्ष आहे साधारणपणे ६०-८० फुटांपर्यंत पण वाढतो त्याची कठीण कवचाची फळे नदीत वाहत जाऊन रूजत असावीत त्यामुळे नदीच्या कडेने हे वृक्ष दिसून येतात.किंचीत राखाडी झाक असलेले गुळगुळीत पांढुरके खोड हे याचे खास वैशिष्ट्ये आहे. ऐन आणि अर्जुन कोकणामध्ये ऐन आणि अर्जुन असे दोन्ही वृक्ष दिसून येतात बऱ्याचदा ऐन आणि अर्जुन यामध्ये गल्लत होताना दिसून येते. दोन्हीही वृक्ष सारखेच दिसतात परंतु ऐनाचे खोड खरखरीत भेगा पडलेले तपकिरी असते तर अर्जुनाचे खोड पांढुरके आणि गुळगुळीत असते. अर्जुनाची फळे अर्जुनाची फळेही वैशिष्ट्यपूर्ण असतात ताक करायच्या रवी चे कणीस असते तसे पाच पंख असलेले फळ असते. पूर्ण तयार झाल्यावर याचा रंग तपकिरी दिसतो आंब्याच्या बाट्याप्रमाणे यावर कठीण कवच असते. नदीच्या पाण्यात वाहत जाऊन नदीकाठी याची झाडे उगवलेली दिसून येतात त्यामुळे 'नदी सर्ज' असेही

बिब्बा

इमेज
  #बिब्बा आजीबाईचा बटव्यातील आणखी एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे बिब्बा किंवा बिबवा.हिंदी मध्ये याला 'भिलावा' तर संस्कृत मध्ये 'भल्लातक' असे म्हणतात.शास्त्रीय भाषेत 'सेमीकार्पस ऍनाकार्डीयम' असे म्हणतात. यापासून काळा रंग मिळतो तो पक्का बसतो त्यामुळे धोबी कपड्यावर नावे टाकण्यासाठी याचा वापर करत यामुळे इंग्रजीत यास 'Marking Nut' असेही म्हणतात. खरं तर ही जंगल संपत्ती त्यामुळे बहुतांशी आदिवासी बांधव रानातून गोळा करुन त्याची विक्री करताना दिसून येतात.पूर्वी सुया पोत विकणाऱ्या बायका हमखास बिब्बे घेऊन यायच्या.कोकणात मात्र अजूनही माळावर बिबव्याची झाडे दिसून येतात. कोकणात याला बोंडीचे झाड असे म्हणतात.सर्वसाधारण कोकणी लोकांना परंपरागत रित्या यांचे औषधी गुणधर्म माहीत आहेत.प्रत्येक घरात बिबवे ठेवलेले एक विशिष्ट मडके किंवा डब्बा असतोच. पायात मोडलेला काटा काढला की त्याजागी बिबव्याचा डाग द्यायचा हा ठरलेलाच उपचार, आता पायात पाणी होणार नाही याची अगदी खात्री.पायाला चिखल्या झाल्या,पायाला भेगा पडल्या,सांधे दुखत असतील,पाठ दुखत असेल,पायाला नखुरडे झाले असेल (कोकणात कोन्या म्हणतात