पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खैर वृक्ष

इमेज
 #खैर  #acacia_catechu  काता बद्दल प्रसिद्ध असलेला काटेरी वृक्ष खैर- बाभूळ,खदिर वगैरे नावाने ओळखली जाणारी वनस्पती असून, फॅबेसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव अकेशिया कॅटेच्यू आहे. खैर हा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष आहे. ९ ते १२ मीटर उंच वाढतो. फांद्या कोवळेपणी हिरव्या व जुन झाल्यावर करड्या व खरबरीत होतात. काटे लहान, पण टोकाला वाकडे असतात.  पाने संयुक्त व पिसासारखी असून, दलाच्या दहा-बारा जोड्या असतात.  फुले पिंगट पिवळी व पानांच्या बगलेत कणिशावर  ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये येतात.  शेंगा पातळ पिंगट सरळ पाच ते आठ सेंटीमीटर लांब व टोकास चोची सारख्या असतात. त्यात तीन ते दहा बिया असतात  खैराचे लाकूड अतिशय कठीण व टिकाऊ असून त्यास वाळवी लागत नाही. तासून व रंधून ते गुळगुळीत होते. शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, मुसळ, होड्या घराचे खांब, तलवारीच्या मुठी,तेलाच्या घाण्यांच्या लाटा, जात्याचा खुंटा, लोहार, सुतार यांच्याकडील हत्यारांचे दांडे, उसाचा रस काढायचा चरक इत्यादीसाठी उपयुक्त असते. खैराच्या खोडाच्या लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळून काढलेल्या पदार्थास 'का...

कांचन वृक्ष

इमेज
#कांचन वृृक्ष #Bauhinia variegata                         ' कांचन' आपल्यासाठी नवीन नाही. आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये त्याचा उल्लेख अतिशय दिमाखात आणि महाराष्ट्राची ओळख म्हणून केलेला आहे. तोच हा कांचन वृक्ष! आठवतात का बघा तुम्हाला या ओळी!                                                        अंजन,कांचन करवंदीच्या काटेरी देशा |                                                        बकुळ फुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा ||                             यावरून तुमच्या हेही लक्षात येईल की महाराष्ट्राची ओळख बनलेले ...